23 March 2023 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, नवी टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूक केल्यास कडक फायदा होईल Realme Narzo 50 5G | रियलमी Narzo 50 5G स्मार्टफोनवर 26% डिस्काउंट, जबरदस्त ऑफर्सबद्दल जाणून घ्या Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा
x

Viral Video | तोंडात पेट्रोल घेउन आगीसोबत खेळ, फुंकर मारताच चेहऱ्यावरील दाढीने पेट घेतला आणि घडलं असं, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | आपण किती स्मार्ट आहोत किंवा आपण कोणताही स्टंट करु शकतो अशा विचारात अनेक व्यक्ती अतरंगी स्टंट करतात. यात काहीजण सफल होतात तर काहींच्या ही स्टंटबाजी चांगलीच अंगलट येते. अशात सोशल मीडियावर तर असे अतरंगी स्टंट करणारे अनेक दिसतात. यात कोणी ट्रेनला लटकून स्टंट करतात. तर काही जण पाणी आणि आगीशी खेळण्याचा प्रयत्न करतात. मात्र असे करणे जिवावर बेतू शकते.

सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा अशीच भयानक स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो मुलगा एका स्टेजवर उभा आहे. खाली अनेक व्यक्ती त्याची करामत पाहण्यासाठी गर्दी करुण उभे आहेत. हा मुलगा हातात एक मशाल घेतलेला दिसतो. नंतर तो तोंडात थोडे पेट्रोल घेतो आणि आगीवर फुंकर मारतो. असे करत असताना मोठी आग पेटलेली दिसते.

त्याने तोंडात पेट्रोल घेताना थोडे त्याच्या दाढीवर देखील सांडते त्यामुळे फुंकर मारताना त्याची दाढी पेट घेते. त्याला हे समजताच तो त्याच्या हाताना आग विझवत असतो. तसेच तेथील बाकीच्या व्यक्ती देखील आग विझवण्याचा प्रयत्न करतात. कशी बशी त्याच्या दाढीला लागलेली आग विझवली जाते. आता हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. याला आता पर्यंत ६ लाखांहून जास्त व्हूव्ज गेले आहेत.

तसेच हा व्हिडीओ पोस्ट करत त्यावर जी चाहता है खुदको जलादू हे गाणं लावलं आहे. त्यामुळे अनेक जण या मुलाची करामत पाहून हसत आहेत. तर काही व्यक्ती कमेंटमध्ये चिंता व्यक्त करत आहेत. कमेंटमध्ये एकाने म्हटले आहे की, ही आग आहे तीच्याशी खेळू नका. तर दुस-याने लिहिले आहे की, खुपच खतरनाक स्टंट आहे, स्वत:च्या जिवाशी खेळू नका.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Patidar (@ravipatidar603)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video man stunt with fire beard petrol trending on social media 04 November 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(135)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x