6 May 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

पार्टटाइम गृहमंत्री गेले; मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचारांसंदर्भात तातडीची बैठक बोलावली

Chief Minister Uddhav Thackeray, Violence against Women in Maharashtra

मुंबई: देशभरात सध्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांनी मोठ्याप्रमाणावर तोंड वर काढलं आहे. मात्र राज्यात मुख्यमंत्री पदासहित गृहमंत्री पद देखील सांभाळणारे हे केवळ पार्टटाइम गृहमंत्री असल्याचा आरोप विरोधकांनी नेहमीच केला होता. कारण, देशभरात महाराष्ट्र राज्य महिला विषयक गुन्ह्यांमध्ये द्वितीय क्रमांकावर असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१७ मध्ये दिलेल्या अहवालात स्पष्ट झालं होतं. तसाही राज्याला गृहमंत्री आहे हे सामान्य माणसाला फडणवीस सरकारच्या काळात कधी माहीतच नव्हतं.

केंद्र सरकारने २०१७ मध्ये प्रसिद्ध केलल्या अधिकृत अहवालात उत्तराखंड आणि मिझोराम या छोट्या राज्यांनी एकूण निर्भया निधीपैकी ५० टक्के निधी वापरल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर छत्तीसगड ४३ टक्के, नागालँड ३९ टक्के आणि हरियाना 32 टक्के या राज्यांनी निधी वापरला आहे. देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी अवघ्या ४ राज्यांनी सर्वाधिक निधी वापरला आहे. तर एकूण निधीच्या, १५ टक्क्यांपेक्षा अधिक निधी देशभरातील १८ राज्यांनी वापरला आहे. महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने २९ नोव्हेंबरला याबाबत लोकसभेत माहिती दिलेली होती.

दरम्यान, राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आजच्या आढावा बैठकीत दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

महिलांवरील अत्याचारुबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

Chief Minister Uddhav Thackeray orders to take Immediate Action Against Violence against Women in Maharashtra

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x