3 May 2025 8:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

'आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे'... आ. धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट

NCP MLA Dhananjay Munde, Gopinath Munde, BJP Leader Pankaja Munde

बीड: गोपीनाथ मुंडेंची गुरुवारी जयंती आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे त्यांची खदखद व्यक्त करण्याची शक्यता आहे. एकंदरीतच जोरदार शक्तिप्रदर्शन करून पंकजा मुंडे पुढील डावपेचांची आखणी करणार हे नक्की.

आज होणाऱ्या मेळाव्यात नेमकं पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळासोबतच अनेक कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. या मेळाव्यातून पंकजा मुंडे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे ओबीसी समाजाची मूठ बांधून नव्या संघटनेची घोषणा करणार? मतदारसंघात पराभव झाला असला तरीही आजच्या शक्तीप्रदर्शानातून पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे मला पक्षात डावलता येणार नाही असा संकेत देणार? की पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाशी फारकत घेणार? या ३ महत्त्वाच्या कारणांमुळे गोपीनाथ गडाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थ असलेल्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावर आपली भूमिका मांडणार आहेत. त्या नेमकं काय करणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय… आपण भारतीय जनता पक्षामध्ये नाराज नाही. मात्र पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं सांगतानाच ‘मोठा नाही पण छोटा भूकंप मात्र नक्की होईल’, असं सांगून पंकजा मुंडेंनी खळबळ उडवून दिलीय.

एकीकडे आज दुपारी होणाऱ्या या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून आठवणी जागवत विनम्र अभिवादन केलं आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन”

धनंजय मुंडे यांनी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे औरंगाबादमधील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी केली. ट्विटच्या माध्यमातूनच त्यांनी ही माहिती दिली होती. त्यांनी लिहिलं होतं की, “सबंध आयुष्य शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांसाठी परिश्रम करणाऱ्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची उद्या जयंती आहे. यानिमित्ताने औरंगाबाद येथील स्व. मुंडे साहेब यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली”.

Web Title:  NCP MLA Dhananjay Munde Post over BJP Leader Gopinath Munde Birth Anniversary Gopinathgad

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या