28 April 2024 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
x

काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार

BJP MLA Ashish Shelar, Shivsena, MP Sanjay Raut

मुंबई: राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्याअगोदर ते लोकसभेतही मंजूर झाले होते. या विधेयकाला दोन्ही सभागृहात विरोधकांनी विरोध केला होता. शिवसेनेने लोकसभेत फारसा विरोध केला नाही. परंतु, राज्यसभेत शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात या विधेयकावर स्पष्ट मत मांडले. या विधेयकाच्या माध्यमातून मतांचे राजकारण व्हायला नको, असे राऊत म्हणाले. एवढेच काय तर या विधेयकाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने सभात्याग केला. परंतु, तरीही राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. दरम्यान, शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन भारतीय जनता पक्ष नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ मंजुरीवेळी सभात्याग करणाऱ्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. काहीजण ‘जनपथला’ घाबरुन सभागृहातून पळाले, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला. देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. परंतु, आज त्यांच्याच शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेना शेलारांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याचबरोबर, आशिष शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भारतीय जनता पक्षामुळे झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच, या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे. “काहींचा विरोध होता.. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले.. काहीजण “जनपथला” घाबरुन सभागृहातून पळाले..?आणि फसले!” असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Web Title:  Shivsena party Leaders Escape From Rajya Sabha During Citizenship Amendment Bill 2019 Voting Due To Congress Says BJP MLA Ashish Shelar

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x