29 April 2024 7:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

हिंदूहृदयसम्राट सावरकर दैवत, हक्कभंग आला तरी सावरकरांवर बोलणार: देवेंद्र फडणवीस

Opposition Leader Devendra Fadnavis

नागपूर : शेतकरी प्रश्न आणि सावरकरांच्या मुद्द्यावर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं. भारतीय जनता पक्ष आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केल्यानंतर विधीमंडळ सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर येऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत सभागृहाच्या पायऱ्यापर्यंत आले. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी आधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या पत्रकार परिषदा पाहता अधिवेशनाच्या काळात या नेत्यांमधील राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगणार, हे निश्चित.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आजपासून सुरू झालं आहे. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्ष आमदारांनी ‘मी पण सावरकर’ अशा टोप्या घालत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसंच राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष सरकारला लक्ष्य करणार असल्याचं दिसत आहे.

 

Web Title:  Opposition Leader Devendra Fadnavis on Sawarkar at Nagpur Winter Session to Protest

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x