29 April 2024 5:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

नागरी समस्यांसंदर्भात मनसेचं वाशी वॉर्ड ऑफिसवर हल्ला बोल आंदोलन

MNS Navi Mumbai Gajanan Kale

वाशी: नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरी समस्यांवरून मैदानात उतरली असून दर आठवड्याला काही ना काही आंदोलन करून पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याचा सपाटा लावला आहे. नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नैतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यालाच अनुसरून मनसेचे नवी मुंबई वॉर्ड ऑफिसवरील आज तिसरे आंदोलन हाती घेण्यात आलं आहे. नागरी समस्यांसंदर्भात पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी वाशी वॉर्ड ऑफिसवर आज भव्य हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं आणि शहरातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते.

तत्पूर्वी नेरुळ विभाग कार्यालयावर मागील आठवड्यात सामान्य नागरिकांच्या विविध समस्यांवरून मोर्चा काढल्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नैत्रुत्वात कोपरखैरणे विभाग कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. कोपरखैरणे विभागातील लोकांच्या विविध समस्यांवरून मनसे ढोल वाजवत मोर्चा काढण्यात आला होता.

कारण कोपरखैरणे परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं तसेच पदपथावरील अनधिकृत फेरीवाले, पाणी समस्या आणि मलनिस्सारण अशा विविध प्रमुख समस्यांवरून प्रशासनाला अवगत करून दिलं जाणार होतं. त्यासाठीच घणसोली डी-मार्ट ते तीन टाकी दरम्यान आंदोलन करण्यात आलं होतं.

तत्पूर्वी २८ नोव्हेंबरला नवी मुंबईतील ६५०० कामगारांचे १४ महिन्यांचे वेतन महापालिकेकडे थकीत आहेत ते पैसे कामगारांना मिळवून देण्यासाठी अमित ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत निद्रिस्त प्रशासनाला जागं करण्यासाठी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला होता आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. नवी मुंबईत महापालिका कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थाळीनाद आंदोलन केलं होतं. पालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा अशा १७ विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांना त्यांची १४ महिन्यांची थकबाकी (एकूण ९० कोटी रुपये) तसंच घंटागाडी कामगारांना त्यांची संपूर्ण ४३ महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

 

Web Title:  MNS Navi MumbaI President Gajanan Kale organised Hallabol Morcha at Vashi Municipal Ward office.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x