8 May 2024 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा
x

मोहिते-पाटलांचा भाजपाला धक्का; पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत

Vijaysingh Mohite Patil, Devendra Fadnavis

पुणे : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, बुधवारी पुण्यात होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. राज्यातील सत्तास्थापनेनंतर दोन्ही नेते पुण्यातील व्यासपीठावर पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याने सर्वांचंच लक्ष लागून होतं. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे पहिल्यांदाच मांजरी येथील ‘व्हीएसआय’ला येत असल्याने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत ते कोणती भूमिका घेणार, यावर चर्चा रंगली होती.

तत्पूर्वी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात मेगाभरती झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्षात सामील झाले. यात राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील याचाही समावेश होता.

मात्र आजच्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्सिट्यूटची सर्वसाधारण वार्षिक सभा वेगळ्याचं घटनांमुळे चर्चेत आली. पहिली म्हणजे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट. तर दुसरी म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट. या भेटीवरून वेगवेगळे तर्क लावले जात असताना मोहिते पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादी परतण्याचे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. त्याच रणनीतीचा भाग म्हणून माळशिरस मतदारसंघाचे विजयसिंह मोहिते पाटलांच्या सुपुत्र रणजितसिंह पाटील यांनी भविष्यातील राजकीय वारे ओळखून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय चित्र बदलले. अनपेक्षितपणे महाविकासाआघाडीचे सरकार आले.विजयसिंह मोहिते पाटलांनी आज पुण्यात पार पडलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या सर्व सभेनंतर ‘ मी राष्ट्रवादीत’ च असल्याचा खुलासा केला. आता त्यांनी भारतीय जनता पक्षाला दे धक्का देत मोठे विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाकडून याला कसे प्रत्युत्तर मिळते ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Web Title:  Former Deputy Chief minister Vijaysingh Mohite Patil gave Indication to Return in NCP Party again.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x