2 July 2020 9:52 PM
अँप डाउनलोड

पुण्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना झळकले एकाच पोस्टरमध्ये

Sonia Gandhi, Sharad Pawar, Uddhav Thackeray

पुणे: ‘बहुमत नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणतात सरकार आमचं येणार. हे सरकार कसं येणार? लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा युती केली. आपण चुकीच्या लोकांसोबत गेलो याचं मला दु:ख आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, हा बाळासाहेबांना दिलेला शब्द मी खरा करून दाखवणार,’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असताना. पुण्यातील कोंढवा भागात एनसीपी’च्या एका कार्यकर्त्याकडून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटे असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. या फ्लेक्सची शहरभर चर्चा सुरु आहे.

सध्या शिवसेना-भारतीय जनता पक्षाने एकमेकांना खोटं पाडण्याचं राजकारण सुरु केल्याने राज्यात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करतानाच यापुढे राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल असा दावा केला आहे. तर बहुमत नसताना सरकार कसं स्थापन करणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. या दोन्ही पक्षांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी काय करता येऊ शकतं यावर चर्चा झाली.

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना पुण्यातील कोंढवा भागात एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यावरील महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्वीकारला आहे..बळीराजाच्या मनातील अन हातातील घड्याळाच्या अचूक वेळेने, धनुष्यबाणातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा…! अशा आशयाचा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या पोस्टरमध्ये लिहिलेला मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रातील जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने संघर्षातील आदेश स्वीकारला आहे. बळीराजाच्या मनातील अन् हातातील घड्याळाच्या अचूक वेळेत धनुष्यबाणातील अचूक वेधाने जाणता नेता स्वीकारावा असं या बॅनरवर लिहिलं आहे. हा बॅनर पुणेकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. पुण्यात झळकलेल्या या बॅनरने राज्यातील नव्या समीकरणाचे संकेत तर दिले नाहीत ना याचीच चर्चा शहरात सुरु आहे. राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेना आघाडीच्या मदतीने सत्तेत सहभागी होणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Congress(371)#NCP(295)#Shivsena(885)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x