रत्नागिरी : प्रशासन हाताळण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद जुन्याची धास्ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आणि त्यामुळे ती भीती वेगळ्याच मार्गाने ते व्यक्त्त करण्यात गुंतले आहेत असं दिसतं. मुख्यमंत्री पदानंतर सर्वात महत्वाचं पद असलेलं गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेल्यास त्यावर निश्चित त्यांच्या पक्षातील अनुभवी आणि बलाढ्य नेते विराजमान होतील आणि सर्वात मोठी कोंडी होईल ती भारतीय जनता पक्षाची याची भाजपाला खात्री आहे आणि त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्याला वेगळाच राजकीय रंग देऊ पाहत असल्याचं म्हटलं जातं आहे.

राष्ट्रवादीकडे सध्या विधिमंडळातील आणि मंत्रालयातील कामकाजाचा सर्वाधिक अनुभव असलेली नेते मंडळी आहेत. त्यामुळे फडणवीसांसारखे सर्वच त्यांच्यासमोर फिके पडणार याचा प्रत्यय अधिवेशनात सामान्यांना आला आहे. त्यामुळे राज्याचा कारभार हाताळताना गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेल्यास मोठी अडचण होण्याची चिंता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सतावू लागली आहे आणि त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केल्याने, त्यांचं मार्गदर्शन देखील उद्धव ठाकरे यांना लाभणार असल्याने भाजप नेते धास्तावल्याचे पाहायला मिळत आहे.

गृहमंत्रिपद तरी राष्ट्रवादीला देऊ नका, नाहीतर ‘मातोश्री’वर सीसीटीव्ही कॅमेरे लागतील, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. महाविकासआघाडीत मंत्रिपदाच्या वाटपावरुन चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्य्क्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला दिल्यास ‘मातोश्री’वर देखील कॅमेरे लागतील. तुम्ही अर्थखातं, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग दिलं. त्यामुळे आता गृहमंत्रिपद देखील दिलं तर मग तुमच्याकडे ठेवलं काय फक्त मुख्यमंत्रिपद? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या अनेक वर्षापासून एकत्र काम केल्यामुळे शिवसेनेने गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ नये असा प्रेमळ सल्ला देतो असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘काय करावं हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं, पण खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलंय, म्हणून माझं व्यक्तिशः प्रेम आहे त्यांच्यावर. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला देऊ नका. ओ, काहीच ठेवत नाही तुम्ही हातामध्ये. गृहमंत्र्यांकडे सगळं असतं. तुम्ही सगळंच देऊन टाकलं गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलंत, तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील’ असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

 

Web Title:  BJP State President Chandrakant patil worried about state Home Ministry may get to NCP Party.

गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची भाजपाला धास्ती? सविस्तर वृत्त