6 May 2024 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका
x

देशातील सर्वांना हिंदू म्हणणे योग्य नाही; आठवले आरएसएस'शी असहमत

Union Minister Ramdas Athawale, Mohan Bhagwat

नवी दिल्ली: देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. सरसंघचालकांनी हिंदुत्वावरून केलेल्या वक्तव्यावर केंद्रीयमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरसंघचालकांनी गुरुवारी म्हटले होते की, देशातील १३० कोटी लोकांना धर्म आणि संस्कृतीच्या पुढे जाऊन आम्ही हिंदूच मानतो. यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी असहमती दर्शविली. सर्व भारतीय हिंदू आहे, हे म्हणणे उचित नाही. एका काळी आपल्या देशात सर्व बौद्ध होते. जर भागवतांना देशातील सर्व लोक भारतीय म्हणयाचं असेल तर ठिकच आहे. देशात बौद्ध, शिख, हिंदू, मुस्लीम, पारसी, जैन आणि लिंगायत पंथाचे लोक राहतात, असंही ते पुढं म्हणाले.

हैदराबाद येथे बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय विजय संकल्प शिबीरात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील १३० कोटी जनतेबाबत विधान केले होते. देशात राहणारी १३० कोटी जनता कोणत्याही धर्माची आणि संस्कृतीची असली तरी आरएसएस या सर्वांना हिंदूच मानत आला आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते.

 

Web Title:  Union Minister Ramdas Athawale not happy with the Mohan Bhagwat Statement over Hindu.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x