19 May 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

मंत्रिमंडळ विस्तार; शिवसेनकडून कोणाला मिळणार संधी

MLA Aaditya Thackeray, Shivsena, Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा सोमवारी दुपारी १ वाजता विधान भवनाजवळ शपथविधी होईल. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. शिवसेनकडून अनेकांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.

महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा सोमवारी विस्तार होत आहे. राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी सलगी केलेल्या अजित पवार यांच्याकडेच उपमुख्यमंत्रीपद सोपविण्यात येणार असून, राष्ट्रवादीने बहुतांशी जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. शिवसेनेने आपला मुंबईचा पाया अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. कॉंग्रेसमध्ये नेहमीप्रमाणेच शेवटपर्यंत घोळ सुरू होता.

 

Web Title:  Cabinet Ministry expansion today and shivsena may give opportunity to MLA Aaditya Thackeray too.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x