9 May 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

मंत्रिमंडळ विस्तार; राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी

NCP Leader Ajit Pawar, NCP President Sharad Pawar

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा सोमवारी दुपारी १ वाजता विधान भवनाजवळ शपथविधी होईल. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. राष्ट्रवादीकडून अनेकांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.

महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा सोमवारी विस्तार होत आहे. राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी सलगी केलेल्या अजित पवार यांच्याकडेच उपमुख्यमंत्रीपद सोपविण्यात येणार असून, राष्ट्रवादीने बहुतांशी जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. शिवसेनेने आपला मुंबईचा पाया अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. कॉंग्रेसमध्ये नेहमीप्रमाणेच शेवटपर्यंत घोळ सुरू होता.

 

Web Title:  NCP may give opportunity to many freshers in State Ministry.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x