15 May 2025 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Waiting Ticket | वेटिंग तिकीट रेल्वे प्रवाशांनो, नवीन नियम लागू, ट्रेनमध्ये सीट विसरावी लागेल, अपडेट लक्षात घ्या ITR Filing 2025 | नोकरदारांनो, ITR फाइल करताना या चुका टाळा, अन्यथा मोठा त्रास होऊन आर्थिक नुकसान होईल EPFO Money Amount | पगारदारांनो सॅलरीतून EPF कट होत असल्यास खात्यात जमा होणार 1,30,35,058 रुपये, फायद्याची अपडेट CDSL Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने घटवली रेटिंग, शेअरची टार्गेट प्राईस सुद्धा अपडेट केली - NSE: CDSL RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK
x

खरेदीदार न मिळाल्यास एअर इंडिया ६ महिन्यात बंद होणार

Air Indian in Loss, Modi Govt

नवी दिल्ली: आर्थिक संकटात अडकलेली एअर इंडिया ही कंपनी लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी तोट्यात जाणाऱ्या एअर इंडियाला वाचवण्यासाठी सरकारने खासगीकरणाचा निर्णय घेतला पण अद्याप एकही खरेदीदार मिळालेला नाही. जूनपर्यंत एकही खरेदीदार न आल्यास एअर इंडियाचे कामकाज बंद करावे लागणार आहे. सध्या एअर इंडियावर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. तरीही सरकारने या कंपनीच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे.

एअर इंडिया कंपनीची सध्या १२ विमानं धुळखात पडून आहेत. ती पुन्हा सुरू करण्यासाठी गुंतवणूकीची गरज आहे. मात्र सरकारने गुंतवणूकीबाबत हात वर केले आहेत. आता तुकड्या-तुकड्यांवर गुंतवणूकीतून एअर इंडियाची गाडी चालवता येणार नाही अस म्हणत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कंपनी बंद होण्याचे संकेत दिले आहेत.

एअर इंडिया कामकाच सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारकडे २४०० कोटी रूपयांची हमी मागण्यात आली होती. परंतू सरकारने केवळ ५०० कोटींची हमी दिली. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सरकारने २०११-१२ या आर्थिक वर्षापासून यंदाच्या डिसेंबरपर्यंत एअर इंडिया कंपनीत ३०,५२०.२१ कोटी रूपये गुंतवले. तर कंपनीला २०१८-१९ या वर्षात अंदाजे ८,५५६.३५ कोटींचा तोटा झाला.

एकीकडे अशी आर्थिक परिस्थिती असताना दुसरीकडे भारत सरकारनेच एअर इंडिया कंपनीचे ७९७ कोटी ९५ लाख रुपये थकवल्याची माहिती समोर आली आहे. भारत सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नाही. विशेष म्हणजे यापैकी जवळजवळ अर्धी रक्कम ४५८ कोटी ९५ लाख ९० हजार रुपये केवळ मोदींच्या दौऱ्यांची रक्कम आहे.

माहितीच्या अधिकाराखाली एअर इंडियाने दिलेल्या उत्तरामधून ही आकडेवारी समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच ३१ मार्च २०१९ रोजी सरकारने एअर इंडियाचे ५९८ कोटी ५५ लाख रुपयांचे थकीत बिल ठेवले होते. या रक्कमेमध्ये मागील सहा महिन्यामध्ये २० कोटींची वाढ झाली आहे. महिती अधिकार कार्यकर्ते कमांडो लोकेश बत्रा (निवृत्त) यांनी दाखल केलेल्या अर्जाला एअर इंडियाने उत्तर दिले आहे. यामध्ये मोदींच्या एकूण प्रवासाचा खर्च एक हजार ३२१ कोटी ४१ लाख रुपये झाला असून त्यापैकी ८६२ कोटी ४५ लाख रुपये कंपनीला सरकारने दिले आहेत. तर अद्याप ४५८ कोटी ९५ लाख ९० हजार रुपये सरकारने अद्याप कंपनीला दिलेले नाहीत.

 

Web Title:  Business Without potential Buyer for Air India Might be Forced to Shut Down in 6 Months Airline official said.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या