15 December 2024 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा
x

Nila Infra Share Price | पैशाने पैसा वाढवा, 14 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करत परतावा देतोय, फायदा घेणार?

Nila Infra Share Price

Nila Infra Share Price | नीला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी निला इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( नीला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

नुकताच नीला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला 306.88 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. निला इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनी आणि निशांत कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त उपक्रमाला एकात्मिक समूह गृहनिर्माण प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम मिळाले आहे. हे कॉन्ट्रॅक्ट गुजरात गृहनिर्माण मंडळाने दिले आहे. निशांत कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबतच्या संयुक्त उपक्रमात नीला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा वाटा 63 टक्के आहे. तर उर्वरित 37 टक्के वाटा निशांत कन्स्ट्रक्शन कंपनीने धारण केला आहे.

याव्यतिरिक्त नीला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला अहमदाबाद शहरात एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्पाचा पुनर्विकास करण्यासाठी गुजरात गृहनिर्माण मंडळाने 125.75 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नीला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.55 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक 12.58 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 13.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

डिसेंबर 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, निला इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 61.9 टक्के भाग भांडवल आहे. तर उर्वरित 37.17 टक्के भाग भांडवल किरकोळ गुंतवणूकदारांनी धारण केले आहेत. नीला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट आणि पायाभूत प्रकल्पांचे बांधकाम आणि विकास या संबंधित व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nila Infra Share Price BSE Live 04 March 2024.

हॅशटॅग्स

#Nila Infra Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x