6 May 2024 12:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

रात्री जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ला; अभाविप संघटनेवर आरोप

JNU, ABVP

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठ्या-काठ्याधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले.

या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.

विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने आयोजित केलेला एक कार्यक्रम सुरु असताना हा हिंसाचार झाला. ‘अभाविप’वाल्यांनी चेहऱ्यावर बुरखे घालून आणि हातात दगड, विटा, लाठ्या, लोखंडी सळया घेऊन अचानक हल्ला सुरु केला. पोलीस त्यांना आवरण्याऐवजी साथ देत होते. हल्लेखोरांनी सैरावैरा धावणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठलाग करून आणि हॉस्टेलमधून बाहेर खेचून बेदम चोपले. या हिंसाचारात आयशू घोष यांचे डोके फुटले व इतरही अनेक विद्यार्थी रक्तबंबाळ झाले, असा आरोप स्टुडन्ट्स युनियनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला. अभाविपवाल्यांच्या या हैदोसास संघिष्ट अध्यापकांनीही फूस लावली व दोघे मिळून विद्यार्थ्यांना ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करत होते, असेही या पत्रकात नमूद केले गेले.

 

Web Title:  Many Students and Professors injured in violence attack at JNU.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x