3 May 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

पुलवामा हल्लाः सुसाइड बॉम्बरला मदत करणाऱ्याला अटक; स्फोटकांची ऑनलाइन खरेदी

Pulwama Attack, NIA Team

नवी दिल्ली: मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश आले आहे. एनआयने शुक्रवारी आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दारला मदत करणारा शाकिर बशीरला अटक केली आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाकिर बशीरने आत्मघातकी हल्लेखोर दारला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती.

अटक करण्यात आलेल्या शाकिर बशीर मागरे याने आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डार याला रसद पुरवली होती. या हल्ल्यावेळी वापरण्यात आलेले बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे अमोनियम नाइट्रेट, नाइट्रो-ग्लिसरीन आणि आरडीएक्स हे ऑनलाइन खरेदी करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती शाकिर बशीर मागरे याच्या चौकशीनंतर समोर आली आहे.

एनआयएने या कारवाईबाबत तपशील जारी केला आहे. शकीरचा पुलवामा हल्ल्यात सक्रिय सहभाग होता. हा आत्मघाती हल्ला करणारा दहशतवादी आदिल अहमद दारला सर्वप्रकारची मदत शकीरने केली होती. शकीरच्या अटकेने या हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती एनआयएच्या हाती येण्याची शक्यता आहे. आदिल आणि पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उमर फारूख या दोघांना पुलवामा हल्ल्याच्या आधी २०१८ पासून आपल्या घरात आश्रय दिल्याची कबुली शकीरने दिली आहे. शकीरला न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.

 

News English Summery: The NIA has released details about the operation. Shakir was actively involved in the Pulwama attack. Shakir had all the help of the suicide bomber, Adil Ahmed Dar. With the arrest of Shakir, important information about the attack is likely to come to the NIA. Shakir has confessed to Adil and Pakistani terrorist Mohammed Omar Farooq, who had been sheltering in their house since 2018 the Pulwama attack. Shakir, who was produced in court, has been given a 15-day jail term.

 

Web News Title: Story NIA Team makes first arrest in 2019 Pulwama terror attack that killed 40 CRPF Jawans.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x