7 July 2020 10:19 PM
अँप डाउनलोड

त्या बैठकीला मोदीच गैरहजर होते, त्यामुळे मी पुलावामाचा बदला घेण्यासाठी जवानांनाच आदेश द्या असं सुचवलं

Sharad Pawar, NCP, Narendra Modi, CRPF, Pulavama Attack

मुंबई : पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारताचे तब्बल चाळीस जवान शहीद झाले होते. देशातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर काही दिवसातच या हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकद्वारे घेण्यात आला. यात ३०० पेक्षा अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केला आहे. परंतु, ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते चाकण येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शरद पवार म्हणाले, पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यानंतर तातडीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. तेव्हा मी पूर्वी संरक्षण मंत्री असल्याने पहिला प्रश्न मला विचारण्यात आला, त्यावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या, असा सल्ला मीच दिला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री सितारामण उपस्थित नव्हते.

विशेष महत्वाच्या विषयावर आणि राष्ट्रीय संकट ओढावलेलं असताना, त्यावेळी मोदी मात्र महाराष्ट्रात यवतमाळच्या दौऱ्यावर होते. आमची दिल्लीत बैठक सुरु होती त्यावेळी मोदी इकडे बोलत होते, मैं चौकिदार हू, देश की सुरक्षा मेरे हात मे हैं. देश को कुछ होने नहीं दुंगा. तिकडं जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन हे बोलायचं सोडून ही ५६ इंचची छाती यवतमाळ मधून हे बोलत होती, अशा शब्दांत पवार यांनी मोदींवर टीका केली.

पवार पुढे म्हणाले, आधी शिवाजी महाराज आणि आता संभाजी महाराजांची भूमिका डॉ. कोल्हेंनी साकारली. खऱ्या अर्थाने आपल्या उमेदवाराने हा इतिहास पुढं आणला. यावेळी फडणवीस यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यात ११,९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ते यावेळी म्हणाले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1241)#Sharad Pawar(266)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x