2 May 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

संदीप देशपांडेंचं ते ट्विट सत्य; रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त जनता विरुद्ध नाईट लाईफ: सविस्तर वृत्त

MNS Leader Sandeep Deshpande, Minister Aaditya Thackeray

मुंबई: मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.

मागील तीन वर्षांपासून म्हणजे २०१७ पासून मुंबईत नाईट लाईफची चर्चा सुरु होती. मुंबई महापालिकेत त्यासंदर्भातली प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निर्णय राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने राज्य शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष होतं. आता मुंबईत येत्या २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

नाइटलाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अनिवासी क्षेत्रात सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले. मुंबईआधी अहमदाबाद शहरात नाइटलाइफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे राहावे असे वाटतेय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हाच ही संकल्पना त्यांनी मांडली होती. मात्र त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही. आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या संदर्भातला निर्णय प्रायोगिक तत्त्वार का होईना पण झाला आहे. त्यामुळे आता पुढे हा निर्णय कायम होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून मुंबई महापालिकेत सत्तेत आलेल्या शिवसेना पक्ष आणि त्यांचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीतील बातम्यांना अनुसरून एक खोचक ट्विट केलं होतं आणि आदित्य ठाकरे समर्थन करत असलेल्या मुंबई नाईट लाईफची देखील खिल्ली उडवली आहे. त्यावेळी ट्विट करताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं की, “२०१९’ची वरळी विधान सभेतील लढाई ही रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त झालेली जनता विरुद्ध नाईट लाईफ अशीच असेल”. आज आदित्य ठाकरे आमदार होऊन मंत्री देखील झाले असले तर त्यांनी मुंबई किंवा स्वतःच्या वरळी मतदारसंघातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे किंवा पायाभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य न देता स्वतःच्या विचारातील प्रलंबित विषयांना अमलात आणल्याने, संदीप देशपांडे यांचं ते ट्विट अखेर खरं ठरलं आहे असंच म्हणावं लागेल.

 

Web Title:  MNS Leader Sandeep Deshpane was commented over Night Life proposal of Aaditya Thackeray.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x