5 May 2024 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर २७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु

Environment Minister Aaditya Thackeray, Night Life in Mumbai

मुंबई: मुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही २०१३ मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. २७ जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

नाईट लाईफमुळे पोलिसांवर ताण येणार असल्याच राजकीय नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. आता पोलिसांना गस्तीच काम असतं. पण, नाइट लाइफमुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही असं देखील आदित्यमुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही २०१३ मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. २७ जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सामान्य जनेतेचे जीवन असुरक्षित असताना ‘नाइटलाइफ’चा घाट कोणाचे बालहट्ट पुरविण्यासाठी घेतला जात आहे? असा बोचरा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला. २७ जानेवारीपासून मुंबईमध्ये नाइटलाइफ सुरु करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. त्यावर ते बोलत होते.

ही नाइटलाइफ नसून किलिंग लाइफ आहे. मुंबईतील कमला मिल येथे आग लागली होती. त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाइटलाइफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती नाही का?’ असा सवाल करत आशिष शेलार यांनी सरकारच्या नाइट लाइफ निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या टीकेचा आदित्य ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. ‘महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठी काम करतेय. लोकांच्या भल्याचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. ‘नाइट लाइफ’चा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी करत आहोत. आमचं मन स्वच्छ आहे. शुद्ध हेतूनंच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ असा टोला आदित्य यांनी हाणला.

 

Web Title:  Environment Minister Aaditya Thackeray talked about Nightlife in Mumbai after cabinet meeting.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x