8 May 2024 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

राज्यातील एका मंत्र्याची आज किंवा उद्या विकेट पडणार | चंद्रकांत पाटलांचा दावा

Chandrakant Patil, Sachin Vaze

कोल्हापूर, १६ मार्च: अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मात्र, कारचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं आणि आता एनआयए आणि एटीएस अशा दोन संस्था मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर, आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा दावा केला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा आज राजीनामा होणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी आज (१६ आज) कोल्हापुरात बोलताना केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण पेटलेले असताना चंद्रकांत पाटील यांनी हा अत्यंत मोठा दावा केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने “राज्यातील अनेक मंत्री एकाच वेळी दिल्लीला गेले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला गेले आहेत. आणखी काही नेते दिल्लीत पोहोचल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडी पाहता एका मंत्र्याचा राजीनामा आज होण्याची शक्यता आहे. हे गृहमंत्री अनिल देशमुख तर नाहीत ना ?” असा सवाल विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “याबाबत मला माहित नाही. मात्र, आज एका मंत्र्यांची विकेट पडणार एवढेच मी सांगू शकतो.” चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाने राज्यात चर्चांना उधाण आले आहे.

 

News English Summary: A minister in the Maharashtra cabinet will resign today, Chandrakant Patil has claimed while speaking in Kolhapur today (today 16). While the political atmosphere in the state is on fire over the Assistant Inspector of Police Sachin Waze case, Chandrakant Patil has made this very big claim.

News English Title: A minister in the Maharashtra cabinet will resign today said Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x