12 May 2024 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641
x

मनसेचा भगवा मोर्चा मोहम्मद अली रोडवरूनच जाणार असल्याने प्रशासन पेचात

MNS Morcha, Mohammed Ali Road, Raj Thackeray

मुंबई: ‘बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून द्या,’ या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच एक मोर्चा काढणार आहे. परंतु या मोर्चाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून जिजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदानाचा मार्ग मागण्यात आला आहे. मोर्चासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये मनसे नेत्यांचा हा निर्णय झाला आहे. हा मोर्चा मोहम्मद अली रोडवरुन नेण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आग्रही आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील पेच वाढण्याची शक्यता आहे.

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समुदाय रस्त्यावर उतरला असून मनसेच्या मोर्चाचा मार्ग हा मुस्लीम बहुल भागातून जाणार आहे. त्यामुळे या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच राज ठाकरेंच्या सुरक्षेचा प्रश्नही पोलिसांसमोर आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाला अन्य मार्गावरुन जाण्यास परवानगी दिली जाऊ शकते. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसेने पोलिसांकडे परवानगी मागितली असून पोलीस योग्य तो निर्णय घेतील असं सांगितलं आहे.

तत्पूर्वी, मनसेचा मोर्चा हा CAA आणि NRCच्या समर्थनासाठी नाही असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यावर चर्चा होऊ शकते मात्र समर्थन होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. नव्या भूमिकेमुळे राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आपण भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जात नाही हेच राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं असल्याचं बोललं जात आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची या मोर्च्याच्या तयारीबाबत बैठक झाली असून मुंबई पोलिसांकडे मनसेने परवानगी मागितली आहे. मोर्चा आझाद मैदानात संपणार हे नक्की पण सुरु कुठून होणार हे पोलिसांनी परवानगी आल्यानंतर कळेल असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.

 

Web Title:  MNS Morcha pass from Mumbai Mohammed Ali Road under Raj Thackeray security question Mumbai police.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x