5 May 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

मुंबई पालिकेचा २०-२१'चा अर्थसंकल्प ३३,४३४.५० कोटीचा; राखीव निधीतून ४३८० कोटीचं कर्ज घेणार

BMC standing committee, BMC Commissioner Praveen Pardeshi, BMC Annual Budget

मुंबई : बंद झालेला जकात कर, मालमत्ता कराच्या वसुलीत झालेली घट आणि मंदीमुळे आटलेले विकास शुल्क आदी विविध कारणांमुळे देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या महसुलात घट झाली असून या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी मंगळवारी मुंबई महापालिकेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार आहेत.

महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांसाठीचा अर्थसंकल्प सादर केला. ३३,४३४.५० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी ३०,६९२.५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता, त्या तुलनेत यंदा २७४१.९१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा बोझा टाकण्यात आला नसला तरी मुंबईकरांसाठी अपवाद वगळता नव्या घोषणाही केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मुंबई महापालिका यंदा पालिकेच्या राखीव निधीतून ४३८० कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने जवळपास २,९४४.५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (२०२०-२१) मंगळवारी सादर केला. मुंबई महापालिकेचे सहआयुक्त आशुतोष सलील यांनी शिक्षण समिती अध्यक्षा, श्रीमती अंजली नाईक यांना अर्थसंकल्प सादर केला. गेल्यामागीलवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात २१०.८२ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 

Web Title:  BMC Commissioner Praveen Pardeshi presented general budget estimated for year 2021 to BMC standing committee.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x