5 May 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

२०२४'ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात - आ. रोहित पवार

NCP MLA Rohit Pawar, NCP President Sharad Pawar, Loksabha 2024

औरंगाबाद: “साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रासारखीच महाविकास आघाडी देशातही झाली तर आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब जेव्हा कुठेही जातात तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे ते ओळखून घेतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे.”असंही रोहित पवार म्हणाले.

“साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. लोकसभेच्या वेळी म्हणजेच २०२४ ला एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी जशी राज्यात एकत्र आहे तशी देशातही एकत्र लढली तर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. महाराष्ट्रात सगळं राजकारण आता सोपं झालं कारण महाविकास आघाडी झाली आहे. जर लोकसभेतही आपण एकत्र लढलो तर एक मराठी माणूस पंतप्रधानपदी बसू शकतो. असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडीचं सरकार फोडण्याचं काम करत आहेत, मुनगंटीवारांनी असं बऱ्याचदा बोलून दाखवलं आहे. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही यश मिळणार नाही. त्यांनी उगाच खोट्या आशेवर राहू नये असंही रोहित पवार यांनी म्हटलं.

तत्पूर्वी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील ही इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की जर भविष्यात एक मराठी अनुभवी राजकारणी पंतप्रधानपदी विराजमान होणार असेल तर मनसे पक्ष नेहमीच शरद पवारसाहेबांच्या पाठीशी एक मराठी माणूस म्हणून नेहमीच ठाम पणे उभा राहील.

 

Web Title:  NCP President Sharad Pawar could become Next Prime Minister of India says NCP MLA Rohit Pawar.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x