28 April 2024 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

महामोर्चा पूर्वी मनसेकडून जोरदार तयारी; उद्या देशभर मनसेच्या भगव्याची चर्चा रंगणार

MNS Mahamorcha, Raj Thackeray, Amit Thackeray

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुण्यात आज ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्यात येणार होती मात्र ऐनवेळी पुणे पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली आहे. असं असलं तरी मनसेचे पदाधिकारी बाईक रॅलीवर ठाम आहेत. पोलिसांनी परवानगी न दिल्यास विनापरवानगी बाईक रॅली काढण्याची भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे मनसे आणि पुणे पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांना मुंबईसह महाराष्ट्रातून हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उद्या मोर्चाचं आयोजन केलं आहे. पक्ष पातळीवर तयारी केल्यानंतर आता मनसेनं मोर्चा यशस्वी करण्यासाठी नागरिकांना आवाहन सुरू केलं आहे. त्यासाठी बॅनर, पोस्टरबरोबरच सोशल मीडियातून वातावरण निर्मिती केली जात आहे. मनसेनं या मोर्चाला घुसखोरांविरुद्धच्या लढाईचंच स्वरूप दिलं असून पक्षानं ट्विटरवर पोस्ट केलेले व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

हिंदूह्दयसम्राट आपल्याला बोलू नका असे राज ठाकरेंनी बजावल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी हिंदूजननायक अशी टी-शर्ट छापली आहेत. काहींनी मोर्चासाठी खास राज ठाकरेंच्या आवाजातील व्हिडीओ बनवले आहेत. एकूणच महामोर्चासाठी मनसेकडून जोरदार वातावरणनिर्मिती सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील महत्वाच्या परिसरात पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून दिले पाहिजे अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत तसेच त्याचे फोटो
व्हाट्सअपवरून पसरविण्यात येत आहेत.

 

Web Title:  MNS Mahamorcha in Mumbai against Bangladeshi infiltrators in the states.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x