28 April 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा
x

दिल्ली: फिर एक बार केजरीवाल सरकार; मोदी-शहांचा प्रचार कुचकामी

Delhi Assembly Election 2020 Exit Poll, CM Arvind Kejrival, BJP

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल. परंतु, गेल्यावेळच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. तर काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीप्रमाणे एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी आम आदमी पार्टीला ४९ ते ६३ जागा, भारतीय जनता पक्षाला ५ ते १९ जागा तर काँग्रेसला ० ते ४ जागा मिळतील, असा अंदाज एबीपी आणि सी व्होटरचा एक्झिट पोल सांगतो. ‘टाइम्स नाऊ’च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत ‘आप’ला ४४ जागा तर भारतीय जनता पक्षाला २६ जागा मिळतील, परंतु काँग्रेसला भोपळा फोडता येणार नाही.

दिल्ली विधानसभा निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला आणि आप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया तर पार पडली आहे. मात्र ११ तारखेला निकाल लागणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक एजन्सीज आणि टीव्ही वृत्त वाहिन्यांचे एक्सिट पोल समोर आल्याने भाजपाची डोकेदुखी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे काँग्रसेचं दिल्लीत पुन्हा पानीपत होताना या एक्झिट पोलमधून दिसत आहे.

 

Web Title:  Delhi Assembly Election Exit poll CM Arvind Kejriwal AAP will win clearly says Exit Poll.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x