नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार,… पुन्हा केजरीवाल सरकार कमबॅक करणार का?… भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची कामगिरी कशी असेल?…. आपची हॅटट्रिक भाजप रोखणार का?… मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरणार का?…. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळत आहेत.

तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदाराला राष्ट्र द्वेषींना हटवा असं आवाहन केलं होतं. मात्र निकालाअंती दिल्लीतील मतदाराने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनाच हटवलं असल्याचं निकाल सांगतो. त्यामुळे मतदाराने जो संदेश द्यायचा तो राष्ट्रीय पक्षांना दिला असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शाहीन बागमधील आंदोलन भाजपानं मुख्य मुद्दा बनवला होता. राष्ट्रवादाच्या मुद्यावर भाजपानं ‘आप’ला लक्ष्य केलं. त्यामुळे शाहीन बाग असलेल्या ओखला मतदारसंघामधून आपचा उमेदवार आघाडीवर आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. सर्व कौल हाती आले असून, दिल्लीकरांनी पुन्हा ‘आप’ला सत्तेत बसवलं आहे. प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपाला अपयश आलं आहे. तर काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा पराभव येणार असल्याचं दिसत आहे. कौल हाती आल्यानंतर ‘आप’चं कार्यालय सज्ज झालं आहे.

मतमोजणीपूर्वीच भाजपचे दिल्ली अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी विजयाचा दावा केला होता. पण भाजप कार्यालयात लागलेल्या पोस्टर्समुळे भाजपने अगोदरच पराभव तर मान्य केला नाही ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. विजयाने आम्ही अहंकारी होत नाही, पराभवाने खचून जात नाही, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल ६७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title:  Delhi Assembly Election 2020 result against BJP Congress and NCP Party.

मोदींच आवाहन होतं ‘राष्ट्र द्वेषींना हटवा’; मतदाराने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला हटवलं