6 May 2024 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

सामना जाहिरातीत नाणार'चा उदोउदो! फसव्या भूमिकेतील शिवसेना पकडली गेल्याची चर्चा

Saamana Newspaper, Advertisement of Nanar Refinery project

मुंबई: लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत नाणार प्रकल्पाविरोधात आघाडी उघडत मते मिळवणाऱ्या शिवसेनेची नाणारवरून कोंडी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामनात’च नाणार प्रकल्पाचा उदोउदो करणारी जाहिरात छापून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातच ही जाहिरात आल्याने कोकणात नाणार प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे कोकणवासियांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या जाहिरातीमुळे शिवसेना स्वतःच स्वतःच्या सापळ्यात अडकली आहे.

सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच’, असा उल्लेख जाहिरातीमध्ये आहे.

राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आणि नंतर भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोकणात नाणारच्या विरोधात प्रचार करून मतेही मिळविली होती. निवडणूक वचननाम्यातही नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याचं वचन शिवसेनेने दिलं होतं. मात्र आता राज्यात आघाडी सरकारमध्ये सामिल होताच शिवसेनेने नाणारवरून भूमिका बदलल्याचं बोललं जात आहे.

नाणार रिफायनरीच्या उभारणीत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. रिफायनरी कार्यान्वित झाल्यामुळे २० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील. यामुळे कोकणवासियांचं स्थलांतर थांबेल, असा दावा आरआरपीसीएलनं जाहिरातीत केला आहे. शिवसेनेनं याआधी सातत्यानं नाणार प्रकल्पाला विरोध केला होता.

वृत्तपत्रात नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहीरात छापून आल्याप्रकरणी खासदार विनायक राउत यांनी खुलासा केला आहे. सामना हे शिवसेनेचं जरी मुखपत्र असलं तरी हे वृत्तपत्र असल्याचं म्हणत वृत्तपत्रांमध्ये इतर जाहिराती येतात तशीच ती जाहिरात आली असेल असं स्पष्टीकरण विनायक राऊतांनी दिलं आहे. सामनाच्या या जाहिरातीमुळे कोकणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

याविषयी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, ‘कंपनी अशा जाहिराती देत असली तरी ते स्वत:च्या मनात मांडे खात असतील. पण सरकारने हा प्रकल्प केव्हाच गुंडाळलेला आहे. जोपर्यंत स्थानिक जनता हा प्रकल्प हवा आहे म्हणून म्हणत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पाबाबत कोणताही विचार करणार नाहीत’ असं खासदार राऊत यावेळी म्हणाले.

 

Web Title: Advertisement of Nanar Refinery project published in Shivsena Saamana Newspaper.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x