28 April 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा
x

ट्रम्प यांचा गुजरात दौरा; भारत म्हणजे फक्त गुजरात नाही: राष्ट्रवादी

PM Narendra Modi, NCP, Sharad Pawar

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ‘हाऊडी मोदी’प्रमाणे ‘नमस्ते ट्रम्प’ असा कार्यक्रम होणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समितीच्यावतीने ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रित करावे, याचे सर्व अधिकार हे अयोजन समितीकडेच असल्याची माहिती देखील रवीश कुमार यांनी दिली आहे.

अहमदाबादमधील गरिबी झाकण्यासाठी भिंती बांधून रस्त्यातील झोपड्या लपवण्याची तयारी झाली आहे. भारत म्हणजे फक्त गुजरात नाही, मग कोणत्याही विदेशी नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये फक्त गुजरातची टिमकी का वाजवली जाते, असा सवालही राष्ट्रवादीनं केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी देशात राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भारत म्हणजे फक्त गुजरात नाही. मग कोणत्याही विदेशी नेत्याच्या दौऱ्यात फक्त गुजरातची टिमकी का वाजवली जाते, असा सवाल राष्ट्रवादीनं मोदी सरकारला केला आहे.

ट्रम्प यांच्या या दौऱ्यासाठी गुजरात सरकार वारेमाप पैसा खर्च करणार आहे. जगातील बलाढ्य आणि शक्तिशाली राष्ट्राच्या अध्यक्षाच्या स्वागताची तयारी संपूर्ण अहमदाबाद शहरात दिसून येतेय. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पैशांची कमतरता भासू नये असे फर्मानच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काढलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या 3 तासांच्या दौऱ्यासाठी गुजरात सरकार जवळपास १०० कोटी रुपयांची उधळपट्टी करणार आहे. एवढंच काय तर ट्रम्प यांच्या प्रवासाच्या मार्गावर जिथं झोपडपट्टीचा परिसर आहे त्या लपवण्यासाठी भिंतही उभारण्यात येत आहे.

 

Web Title: NCP Party attacks PM Narnedra Modi and BJP Government over US President Donald Trump Ahmedabad visit.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x