1 May 2024 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

विवाह सोहळ्यात लग्नकार्य सोडून भाजप नेत्यांनी रचला होता फोडाफोडीचा कार्यक्रम - सविस्तर वृत्त

amit Shah, Piyush Goyal, JP Nadda, Jyotiraditya Scindia

नवी दिल्ली, ११ मार्च : ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला. त्यांना भाजपमध्ये घेण्याच्या घडामोडींमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीच महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळी अमित शहा यांची ज्योतिरादित्य शिंदे यांनी भेट घेतली. त्यानंतर शिंदेंना घेऊन अमित शहाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले होते. नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतरच ज्योतिरादित्य शिंदे याचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता.

ज्योतिरादित्य शिंदे हे तरूण, बहुआयामी आणि प्रभावी नेतृत्त्व आहे. त्यांच्या अनुभवाचा भाजपला राज्यात त्याचबरोबर केंद्रातही फायदा होणार आहे. सध्या भाजपकडे मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान आणि नरेंद्रसिंह तोमर असे दोन नेते आहेत. पण पक्षाकडे राज्यात तरूण नेतृत्त्व नव्हते. ज्योतिरादित्य शिंदेंमुळे ते शक्य होईल, असे भाजपच्या या नेत्याने सांगितले.

आज अधिकृत प्रवेश झाल्यानंतर नेमक्या घडलेल्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. प्रवेश आज झाला असला तरी या प्रक्रियेची आणि योजेनची मुहूर्तवेड जेथे रचली गेली ते ठिकाण आणि क्षण समजल्यास असं मनात येईल की भाजपचे नेते प्रत्येक क्षणी केवळ फोडाफोडीच्या चर्चांवरच कामं करत असतात का? कारण देखील तसंच समोर आलं आहे.

मागील आठवड्यात जेपी नड्डा यांचा मुलगा गिरीष याच्या विवाहाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, रेल्वेमंत्री पियुष गोयल आदी भाजपाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी नड्डा व्यस्त असताना चौहान, गोयल यांची अमित शहांसोबत एका कोपऱ्यात सिक्रेट मिटिंग झाली. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात आणण्याची चर्चा झाली.

Web News Title: Story Jyotiraditya Scindias proposal BJP President JP Nadda sons reception party Amit Shah planned.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x