3 May 2025 10:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

केंद्राकडून फक्त तांदूळ; केशरी कार्डधारकांना लाभ नाही; भाजपच्या आरोपातील हवाच गेली

Covid19, Corona Crisis, CM uddhav Thackeray

मुंबई, ०८ एप्रिल: राज्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. हा काळ गुणाकाराचा आहे. चिंतेचे कारण आहे पण घाबरु जाऊ नका. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी घरी बसणं हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण लवकरच या परिस्थितून बाहेर पडू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनेतून वगळलं आहे, अशी माहिती देतानाच राज्य सरकारकडून मात्र मध्यमवर्गीयांनाही ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप करायला सांगूनही राज्य सरकार धान्य वाटप करत नसल्याच्या भाजपच्या आरोपातील हवा निघून गेली आहे.

तसेच ‘केंद्रांची योजना अन्नसुरक्षा लाभार्थ्यांसाठीच आहे. सर्वांची सामुहिक जबाबदारी, केंद्र आणि राज्य दोघेही काम करत आहेत. साडेपाच ते सहा लाख लोकांना सरकार रोज जेवण पुरवत आहे. केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य देणार,’ अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 

News English Summary: Meanwhile, the central government’s plan includes only rice allocation. Chief Minister Uddhav Thackeray said that the state government is giving away three kilograms of wheat at Rs 8 per kg and rice at Rs 12 per kg. Given. So, despite the central government asking for free allotment of food grains, the allegations against BJP that the state government is not distributing food grains are gone.

News English Title: Story Chief Minister Uddhav Thackeray reaction on central governments free rice distribution scheme Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या