3 May 2025 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कोरोना विषाणूची चाचणी खासगी लॅबमध्ये मोफत व्हावीः सर्वोच्च न्यायालय

Covid19, Corona Crisis, Supreme Court of India

नवी दिल्ली, ०८ एप्रिल: कोरोना विषाणूची मोफत चाचणी करण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केली आहे. खासगी लॅबमध्ये कोरोना विषाणूची मोफत चाचणी झाली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोरोना विषाणू संबंधित प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना योद्ध्याची उपमा देत त्यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे. खासगी लॅबमध्ये तपासणीची प्रक्रियाही केली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना भरपाई देणे शक्य आहे का? त्याची व्यवहार्यता तपासून पाहा. हे शक्य झाल्यास नागरिकांना पैसे भरावे लागणार नाहीत, असे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस.रविंद्र भट यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. “करोना व्हायरसच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना इतके महागडे दर आकारण्याची परवानगी देऊ नका. सरकारकडून खासगी प्रयोगशाळांना भरपाई देण्यासाठी यंत्रणा तयार करा” असा सल्ला न्यायमूर्ती भूषण यांनी दिला. केंद्र सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल तृषार मेहता सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.

केंद्र सरकारने २१ मार्चला खासगी लॅबने प्रत्येक कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी जास्तीत जास्त ४,५०० रुपयांपर्यंतच फीस घ्यावी असे म्हटले होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर), कोरोना व्हायरसच्या तपासणीसंदर्भात खासगी प्रयोगशाळांसाठी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, एनएबीएल प्रमाणित सर्व खासगी प्रयोगशाळांना ही तपासणी करण्याची परवानगी दिली आहे.

 

News English Summary: The Supreme Court has directed the Supreme Court to arrange for a free trial of the corona virus. The court said the Corona virus should be tested free in a private lab. During the hearing on the Corona virus case, the apex court has asked doctors to provide warlike paraphernalia. The court said the investigation should also be conducted in a private lab.

News English Title: Story Corona lock down supreme court suggested Central Government to do no let private labs charge high amount for Corona virus test Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या