2 May 2024 8:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

आपल्यापर्यंत कोरोना पोहचणार नाही या अतिआत्मविश्वासात फसू नका

Covid 19, Corona Crisis, Mann Ki Baat, PM Narendra Modi

नवी दिल्ली, २६ एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून आज जनतेशी संवाद साधला. भारतात कोरोनाविरोधाची लढाई जनता लढत आहे. शासन आपल्या सोबत आहे. आज पूर्ण देश, प्रत्येक नागरिक या लढाईचा शिपाई आहे. या लढाईचे नेतृत्व करत आहे. पूर्ण जग या कोरोनाशी लढतोय. भविष्यात कोरोनाविरोधातील लढाईचा वेध घेतला जाईल तेव्हा भारतातील नागरिकांच्या लढाईचा गौरव होईल असे ते म्हणाले.

देशातील सर्वजण सामर्थ्याने कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे. तुमच्या हृदयातील भावना कोरोनाविरोधातील लढाईला बळ देत आहेत. कोणी मास्क बनवतं, कोणी सबसिडी सोडत आहे, कोणी पेन्शन तर कोणी पुरस्काराची रक्कम पीएम निधीला देत आहे. तसंच शेतकरी सुद्धा या लढाईत आपले योगदान देत आहे, असे मोदींनी सांगितले.

मी नागरिकांना आवाहन करतो की अतिआत्मविश्वासात फसू नका. आपल्यापर्यंत करोना पोहचणार नाही, अशा भ्रमात राहण्याची चूक करू नका. आपल्याकडे म्हटलं जातं, सावधानता हटी, दुर्घटना घटी… टाळाटाळ करत सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार संधी मिळताच दुसऱ्यांदा वाढू शकतात, असं आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय. त्यामुळे यावर उपचार गरजेचा आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं.

 

News English Summary: I urge citizens not to fall into overconfidence. Don’t make the mistake of living in the illusion that Corona won’t reach you. It is said that fires, debts and illnesses that have been abandoned by evasion can increase for the second time as soon as the opportunity arises. Therefore, it needs treatment, said the Prime Minister.

News English Title: Story Corona virus PM Narendra Modi Mann Ki Baat on covid 19 fight News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x