19 May 2024 9:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

भाजप आमदाराची सरकारी शाळेत बिर्याणी पार्टी; सोशल डिस्टन्सिंगला हरताळ

Corona Crisis, Covid19, BJP MLA Biryani Party

बंगळुरू, ११ एप्रिल: जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनाने ४० जणांचा जीव घेतला असून तब्बल १ हजार ०३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा ७ हजार ४४७ वर पोहचला आहे.

देशात कोरोना पसरत असताना लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळा असा सल्ला मोदी सरकार देतं आहे, मात्र त्यांचेच आमदार सर्व नियम आणि सूचना धाब्यावर बसवत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कर्नाटकच्या टुमकूरचे भाजपा आमदार एम. जयराम यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिर्याणी पार्टी दिली. गुब्बी शहरातील लोक मोठ्या संख्येनं या पार्टीला जमले होते.

विशेष म्हणजे सरकारी शाळेत त्यांनी ही पार्टी दिली. जयराम यांच्या पार्टीला उपस्थित असलेल्या अनेकांनी फेस मास्क घातला होता. मात्र त्यांनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी गर्दी टाळा, कार्यक्रमाचं आयोजन करू नका, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी अनेकदा केल्या आहेत. मात्र भाजपाच्याच काही नेत्यांनीच त्यांच्या सूचना गांभीर्यानं घेतल्या नसल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं. कारण कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे २०७ रुग्ण आढळून आले आहेत.

 

News English Summary: Modi government is advising people to follow social distancing while Corona is spreading across the country, but their own legislators are seeing all the rules and suggestions. Because the BJP MLA from Tumkur in Karnataka. Jayaram gave a biryani party to his birthday. A large number of people from the city of Gubbi had gathered at this party.

News English Title: Story Lock down rules hundreds served Biryani Karnataka BJP Party MLS birthday party News Latest Updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x