14 December 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

बेजवाबदार भाजप नेत्यांच्या मित्रांसोबत पार्ट्या; मग जवाबदारी ढकलतात मुख्यमंत्र्यांवर

Corona Crisis, Covid19, BJP Corporator

पनवेल, ११ एप्रिल: देशात लॉकडाउन जाहीर होण्याआधीच राज्यात उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. मात्र राज्यातील करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. देशात सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात शनिवारी करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांचा आकडा हा आता १,६६६ वर पोहोचला आहे. शनिवारी दुपारपर्यंतची ही आकडेवारी आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात दुपारपर्यंत ९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे यातील सर्वाधिक ७२ रुग्ण हे मुंबईतील आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना भाजपचे राज्यातील नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करत असून, स्वतःच्या सामाजिक जवाबदारी विसरत आहेत असंच म्हणावं लागेल. कारण लॉकडाऊनचं उल्लंघन करून मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणारे पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांना अटक करण्यात आली आहे.

पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लॉकडाऊनच्या काळात पार्टी आयोजित केली जाण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. बहिरा हे आपल्या दहा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे. लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित असताना बहिरा यांनी हा प्रकार केल्यानं त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांना याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार असून ते काय भूमिका घेतात, याकडं लक्ष लागलं आहे.

 

News English Summary: This action has been taken by Panvel police. This is the first event in the state to hold a party during the lockdown. Deaf is reported to be having a birthday party with ten of his friends. While Delegates are expected to behave more responsibly, Dehra has demanded the cancellation of his post of councilor. The municipal commissioners have the right to decide on this and what role they play.

News English Title: Story Panvel police arrested BJP corporator for hosting birthday party during lockdown in Maharashtra Covid19 News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x