27 April 2024 5:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

संसर्ग वाढतोय; महाराष्ट्रातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता

Covid19, Corona Crisis

नवी दिल्ली, ११ एप्रिल:  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत विनंती केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाहतूक व्यवस्थेवरील निर्बंध आणखी काही दिवस कायम ठेवण्याची सूचना केली.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे सात हजाराच्या पुढे गेली असून यातील जवळपास २० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. या आकडेवारीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी राज्यातला लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींशी संवाद साधताना मांडलेली भूमिका पाहता राज्यातलं लॉकडाऊन वाढवलं जाण्याची दाट शक्यता आहे.

 

News English Summary: The 21-day lockdown, which was announced to stop Corona’s spread, ends April 14. There is confusion among the general public about whether this lockdown will be raised or increased. It is likely that this lockdown will be extended as the situation in Corona is still not controlled. Prime Minister Narendra Modi interacted with the Chief Ministers of all the states through video conferencing.

News English Title: Story Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray demand to PM Narendra Modi lockdown extension Covid19 News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x