3 May 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मुंबई धारावीत प्रत्येकाच्या घरी जाऊन कोरोना स्क्रिनिंग सुरू

Covid19, Corona Crisis, Medical Association, Dharavi

मुंबई, ११ एप्रिल: मुंबईतील धारावीमध्ये आणखी एकाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालाय. बलिगा नगर परिसरातील ८० वर्षांच्या रूग्णाच्या मृत्यूनंतर धारावीतील मृतांचा आकडा हा चारवर पोहचला आहे. आतापर्यंत या भागात २८ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले असून परिसर संपूर्पणे सील करण्यात आलाय. मुंईतील सर्वाधिक धोकादायक क्षेत्र म्हणून धारावीकडे पाहिले जात असून या भागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई महपालिका आणि महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने १५० वैद्यकीय कर्मचारी धारावीतील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक नागरिकाची स्क्रिनिंग घेत आहेत. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून कालच्या १५७४ रुग्णांमध्ये आज आतापर्यंत आणखी ९२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या १६६६ वर पोहोचली आहे. नव्यानं लागण झालेल्यांमध्ये एकट्या मुंबईतील ७२ जणांचा समावेश आहे.

कुणालाही ताप सर्दी खोकला अशी लक्षणं आढळून आली तर त्यांना क्वॉरंटाइन करून यांचे कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने १५० खासगी डॉक्टरांची टीम तयार केली आहे. खाजगी रुग्णालयातील दोन डॉक्टर, पालिकेचे दोन आरोग्य अधिकारी आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची टीम घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करेल.

 

News English Summary: A combined university of Mumbai Municipal Corporation and Maharashtra Medical Association has 150 medical staff going to every house in Dharavi and screening every citizen. The number of coronary arteries in the state is increasing day by day, with 92 more patients being added to 1574 yesterday. Due to this, the population of the state has reached 1666. Among the newly infected, there are 72 people in Mumbai alone.

News English Title: Story Screening of Dharavi residents has begun from today 150 doctors from Maharashtra Medical Association helping Brihan Mumbai Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या