11 May 2025 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचले, हे मंत्रालय की 'उंदरालय' : सामना

मुंबई : एकनाथ खडसे यांनी उघडकीस आणलेला मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याची संधी हेरून शिवसेनेने पुन्हा भाजपवर टीका केली आहे. सामना अग्रलेखात या वरून टीका करण्यात आली असून हे मंत्रालय आहे की उंदरालय असा बोचरा प्रश्न फडणवीस सरकारपुढे उपस्थित केला आहे.

शिवसेना संधी मिळताच भाजपवर जोरदार टीका करते. हा उंदीर घोटाळा थेट विधानसभेतच भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांनी लावून धरल्यावर त्यावर टीका करण्याची आयती संधी शिवसेनेला मिळाली आहे. सामना मध्ये ‘मंत्रालय नाही तर उंदरालय’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या कथित स्वच्छ प्रशासनाला बिळं पडली असून राज्याचे मंत्रालय आता जणू उंदरालय झाले असल्याची जळजळीत टीका सामना वृत्त पत्रातून करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले असून ते उंदीरमुक्त करण्याची जवाबदारी सुद्धा सरकारचीच असून जर तसे न केल्यास राज्यातील जनताच पिंजरा लावून बसली आहे असा जळजळीत टोमणा सुद्धा फडणवीस सरकारला लगावला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या