2 May 2025 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

मोदीसरकारने गोरखांना धोका दिल्याचा आरोप करत 'जीजेएम' ची सत्तेला लाथ

नवी दिल्ली : एनडीएला सहकारी पक्षांकडून एकावर एक धक्के मिळण्याचे सत्र सर्वच राज्यात सुरु झाले आहे. एनडीएचा जुना सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) ने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मोदीसरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याने आम्हाला एनडीएपासून फारकत घ्यावी लागत असल्याचा आरोप जीजेएम ने केला आहे.

एनडीएला एकाच महिन्यात मित्र पक्षांकडून मिळालेला हा दुसरा धक्का आहे. काही दिवसांपूर्वी चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीने सुद्धा हाच आरोप मोदीसरकार वर केला होता. गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते एल एम लामा यांनी शनिवारी ह्या निर्णयाची घोषणा केली. यापुढे आमच्या पक्षाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंव्हा भाजप बरोबर कोणताही संबंध असणार नाही. मोदीसरकारने गोरखा जनतेला धोका दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संघर्षाची ठिणगी पडली ती पश्चिम बंगालमधील भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्या वक्तव्याने, ते म्हणाले की भाजपची गोरखा जनमुक्ती मोर्चाबरोबर असलेली युती ही केवळ निवडणुकीपुरतीच असून आम्ही त्यांच्याबरोबर कोणत्याही राजकीय मुद्यावर समजोता केला नसल्याचे वक्तव्य केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची नियत स्पष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुढे एल एम लामा पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, गोरखा लोकांचे स्वप्न साकार करणे हेच गोरखा जनमुक्ती मोर्चाचे ध्येय आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्या वक्तव्याने आमची फसवणूक झाल्याची भावना संपूर्ण गोरखा समुदायात निर्माण झाल्याच लामा म्हणाले. मोदीसरकार गोरखा लोकांच्या संवेदनाप्रती जागृत नसून त्यांच्या समस्या सुद्धा समजून घेत नसल्याचा आरोप मोदीसरकारवर केला आहे.

युती धर्म निभावताना आम्ही भाजपला दार्जिलिंग लोकसभा मतदासंघात २ वेळा म्हणजे २००९ आणि २०१४ मध्ये विजय मिळवून दिला. त्यामागे आमचा उद्देश हाच होता की, भाजप गोरखा जनतेच्या मूळ समस्या सोडवतील, परंतु तसे काहीच न झाल्याने दार्जिलिंग आणि पहाडी प्रदेशात मोदीसरकार विरुद्ध प्रचंड अविश्वासाचे वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाला गोरखालँड नावाने वेगळं राज्य करण्याची मागणी असून त्यासाठी प्रचंड मोठी आंदोलन सुद्धा झाली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या