4 May 2025 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

दुःखद! राज्यात तब्बल १६७१ पोलिसांना कोरोनाची बाधा, १८ मृत्यू

Maharashtra, Covid 19

मुंबई, २३ मे: राज्यात कोरोनामुळे आणखी ६० जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २६०८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर त्याचवेळी ८२१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा ५० हजारच्या दिशेने मार्गक्रमण करत असून आज हा आकडा ४७,१९० वर पोहचला आहे. सध्या प्रत्यक्षात ३२,२०१ कोरोना बाधित रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातल्या १६७१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये १७४ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर १४९७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन महाराष्ट्रात १८ पोलिसांचा मृत्यू जाला आहे. तर आत्तापर्यंत ५४१ पोलीस हे करोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी यासंदर्भातली माहिती दिली असून एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आज झालेल्या ६० मृत्यूंपैकी ४० मृत्यू मुंबईत, १४ पुण्यात, २ सोलापुरात, १ वसई-विरारमध्ये, १ सातऱ्यात, १ ठाण्यात आणि १ नांदेडमध्ये नोंदवला गेला आहे. ज्या ६० जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये ४१ पुरुष आणि १९ महिला होत्या. ६० पैकी २९ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे होते. तर २४ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. इतर ७ जण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मागील २४ तासांमध्ये झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३६ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते.

 

News English Summary: 1671 police in Maharashtra have been hit by the Corona. This includes 174 police officers. While 1497 police personnel are involved. So far, 18 policemen have been killed in Maharashtra due to coronary obstruction.

News English Title:  The Total Number Of Positive Cases In The Police Force In The State Reaches 1671 In Maharashtra News latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या