4 May 2025 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

राज्यात कोरोनाचे नवे २०९१ रुग्ण; एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ३६००४ - आरोग्यमंत्री

Maharashtra Covid 19, Rajesh Tope

मुंबई, २६ मे: महाराष्ट्रात आज २०९१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातली संख्या ५४ हजार ७५८ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३६ हजार ४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ११६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६ हजार ९५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात आज दिवसभरात १ हजार १६८ करोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात १६ हजार ९५४ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ९० हजार १७० नमुन्यांपैकी ५४ हजार ७५८ नमुने करोना करिता पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६७ हजार ६२२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, ३५ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या २ हजार ५६२ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १६ हजार ७८० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून, ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात ९७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३९ मृ्त्यू मुंबईत, ठाण्यात १५, कल्याण डोंबिवलीत १०, पुण्यात ८, सोलापुरात ७, औरंगाबादमध्ये ५, मीरा भाईंदरमध्ये ५, मालेगावमध्ये ३, उल्हासनगरमध्ये ३ आणि नागपुरात १ मृत्यूची नोंद झाली आहे.

 

News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 54758 Today, newly 2091 patients have been identified as positive. Also newly 1168 patients have been cured today,totally 16954 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 36004.

News English Title: The current count of COVID 19 patients in the state of Maharashtra is 54758 Today News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या