3 May 2024 4:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मुंबईतील कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत सरकारच्या प्रयत्नांना यश येतंय

Corona virus, Dharavi

मुंबई, २८ मे: धारावीसह आसपासचा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र दिलासा देणारी बाब अशी की, आता धारावीतील कोरोना प्रकरणांमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. बुधवारी एका दिवसात किमान १८ संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी, कोरोनाची दुप्पट वाढ आणि सरासरी वाढीचा दर देखील कमी झाला आहे.

धारावी येथे एकूण १ हजार ५४१ कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी ४५३ पूर्णपणे बरे झाले आहेत. येथे कोरोना दुप्पटीचा दर आता ३ दिवसांवरून १९ दिवसांवर आला आहे, तर संपूर्ण मुंबईत हा दर ११ दिवसांचा आहे. जर अशी स्थिती असेल तर धारावीत देखील डी वॉर्ड (वरळी, लोअर परेल) सारखी सुधारणा पाहायला मिळेल. २१ मे पर्यंत ८१२ रुग्ण होते त्यापैकी ४१० बरे झाले आहेत.

धारावीमध्ये आतापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर मुंबईच्या जी वॉर्डात एकूण २ हजार ७७ कोरोना रुग्ण आहेत. या प्रभागात दादर, माहीम, धारावी असे भाग आहेत. जी वॉर्डातील कोरोनाचा सरासरी दर ५.१ टक्क्यांपर्यंत खाली आला असून गेल्या सात दिवसांत कोरोना संक्रमण लक्षात घेता त्याचे मूल्यांकन केले गेले आहे. तर मुंबईतील कोरोनाचा सरासरी विकास दर ६% आहे.

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.५ दिवस होता तो काल १४.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.५ टक्के एवढे आहे. मात्र, पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे

दरम्यान, राज्यात काल १०५ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तर दिवसभरात तब्बल २ हजार १९० नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५६ हजार ९४८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल १००२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ९७४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १०६५ वर पोहोचली आहे.

 

News English Summary: The surrounding area including Dharavi has become a hotspot for corona. But the reassuring thing is that now there has been a slight improvement in the corona cases in Dharavi. At least 18 infected patients were found in a single day on Wednesday. At the same time, the corona has doubled in size and the rate of average growth has also decreased.

News English Title: Corona virus Dharavi 18 cases day infection has been slowed now slum area News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x