2 May 2024 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मोदी २.० सरकारची वर्षपूर्ती; पंतप्रधानांचा जनतेशी पत्रसंवाद

Modi government, Prime Minister writes letter to citizen

नवी दिल्ली, ३० मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला आज ३० मे रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहलं आहे. दरवेळेस पंतप्रधान मोदी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतात. मात्र आज खास दिनानिमित्त मोदींनी जनतेला पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या सरकारमध्ये घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख केला आहे.

कलम ३७०, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ट्रिपल तलाक, नागररिकत्व सुधारणा कायदा इत्यादी महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आले आहेत. या ऐतिहासिक निर्णयांमध्ये भारताच्या विकास यात्रेला गती मिळाली असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं आहे. तसंच अनेक दशकानंतर सलग दुसऱ्यांदा बहुमताने जनतेने भाजपला निवडणून दिलेल्या संधीबद्दल मोदींनी जनतेचे आभार देखील मानले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता नावाच्या एका व्यक्तीनं ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. त्यानं त्यापूर्वी एक भावूक करणारं आणि आपल्या व्यथा मांडणारं पत्र लिहिलं होतं. तसंच त्यानं आपण आत्महत्या का करत आहोत हेदेखील सांगितलं होतं. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हे पत्र शेअर करत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरूर वाचावं अशी विनंती त्यांनी केली आहे.

“उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता यांनी ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली ही अतिशय दु:खद घटना आहे. त्यांच काम बंद बंद झालं होतं. तसंच त्यांना आपल्या आईचे उपचारदेखील करायचे होते. सरकारकडून केवळ रेशन मिळालं होतं. परंतु आणखीही काही गोष्टी आवश्यक असतात त्या खरेदी कराव्या लागतात आणि काही गरजाही असतात असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे.” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. “हे पत्र कदाचित वर्षपूर्तीच्या पत्राप्रमाणे गाजावाजा करत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. परंतु एका हे पत्र तुम्ही वाचाच. भारतात आजही अनेक जण अशाच परिस्थितीचा सामना करत आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.

 

News English Summary: May 30 marks the one year anniversary of the second term of Prime Minister Narendra Modi’s government. On the occasion of this year, Prime Minister Modi has written a letter to the people. Every time Prime Minister Modi addresses the people through video. But today, on the occasion of a special day, Modi has written a letter to the people.

News English Title: The completing of first year of second term of Modi government Prime Minister writes letter to citizen News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x