30 April 2025 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
x

शिवसेनेचा सोनू सुदवर संशय तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्तुती

Sonu Sood, Sanjay Raut, Saamana Newspaper, Migrants Lockdown

मुंबई, ७ जून: सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.

सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

दरम्यान, शिवसेना जरी सोनू सूदला लक्ष करत असली तरी राष्ट्रवादीचे नेते मात्र सोनू सुदची स्तुती करताना दिसत आहेत. प्रथम जयंत पाटील यांनी सोनू सुदची स्तुती केली होती आणि त्यानंतर ट्रेंड सुरु झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तर सोनू सुदची थेट घरी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेना जरी सोनू सुदवर संशय व्यक्त करत असली तरी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेले राष्ट्रवादीचे नेते मात्र सोनू सुदच्या कामावर अत्यंत खुश असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: Raut has said in his article that an attempt is being made to make the Thackeray government a failure by promoting Sonu Sood. “Maharashtra has a long tradition of social movement. It has many names from Mahatma Jyotiba Phule to Baba Amte, now Sonu Sood’s name will be mentioned in it. Sonu’s photo and video were released while helping the workers to go home.

News English Title: Raut has said in his article that an attempt is being made to make the Thackeray government a failure by promoting Sonu Sood News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या