3 May 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड
x

भाजपचे धाबे दणाणले, महाराष्ट्रात पण लिंगायत समाजाचा भडका ?

सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विधानाने संपूर्ण लिंगायत समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी. जातील आरक्षण, सोलापूर विद्यापीठाचं नाव बदलून आणि लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मागून तुमचं पोट भरणार आहे काय ? असा शब्द प्रयोग राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लातूर येथे आयोजित बसव महामेळाव्यात केला.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या या विधानाने संपूर्ण लिंगायत समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. ताबडतोब सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची राज्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी नाहीतर संपूर्ण लिंगायत समाज आणि लिंगायत समाजाच्या सर्व संघटना राज्यभर मोर्चे काढतील असा थेट इशाराच महाराष्ट्र बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवानंद हैबतपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वराचे नाव देण्यात यावे म्हणून लिंगायत समाज संघर्ष करत आहे आणि दुसरं म्हणजे तिथे कर्नाटकात सरकारने लिंगायत समाजासाठी स्वतंत्र धर्माची शिफारस केली आहे. असे असताना सुद्धा सुभाष देशमुख ज्या पद्धतीने या विषयावर बोलले त्यावरून त्यांच्या विकृत मानसिकतेचे लक्षण समोर आल आहे. आमच्या लिंगायत समाजाची काळजी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःची नैतिकता तपासावी अशी समज महाराष्ट्र बसव परिषदेने दिली आहे.

सहकार खात्याच्या व सत्तेच्या माध्यमातून देशमुखांनी जनतेला लुबाडल्याचा आरोपही बसव परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी देशमुखांची हकालपट्टी करून लिंगायत समाजाची माफी मागावी अन्यथा कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद पडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेला मनीष काळजे, अक्षय बकालेस्वामी, दत्ता इरपे आदी उपस्थित होते.

आधीच कर्नाटकात याच विषयावर अडचणीत असलेली भाजप आता महाराष्ट्रात सुद्धा अडचणीत सापडल्याने याचे थेट पडसाद दिल्ली दरबारी सुद्धा उमटण्याची चिन्हं आहेत.

महाराष्ट्र बसव परिषदेने विचारल, राममंदिर बांधून भरणार का पोट?

आम्हाला विचारात जातील आरक्षण, सोलापूर विद्यापीठाचं नाव बदलून आणि लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मागून तुमचं पोट भरणार आहे काय ? मग राम मंदिर बांधून कोणाची पोटं भरणार आहेत? असा सवालही अॅड. हैबतपुरे यांनी यावेळी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x