मुंबई : मुंबईमधील बीकेसीतील महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारसाहेबांनी मोदींचा नाद करू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही.

शरद पवारांनी मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानावर होणाऱ्या खर्चाची खिल्ली उडविली होती. शरद पवार म्हणाले होते की, मी सुद्धा चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री झालो परंतु मुख्यमंत्री कार्यालयात चहावर इतका खर्च कधीच झाला नव्हता.

तोच धागा पकडत आज मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली. फडणवीस म्हणाले की, आम्ही जे पितो तेच आम्ही जनतेला पाजणार. परंतु पवारसाहेबांचे कार्यकर्ते जे पितात ते आम्ही जनतेला पाजू शकत नाही. पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पवारसाहेब तुम्ही चहावाल्याच्या नादी लागू नका. तुम्ही २०१४ ला नादी लागून बघितलं आणि तुमची धूळधाण उडाली. आता पुन्हा नाद करू नये अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही अशी जळजळीत टीका मुखमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महामेळाव्यातील भाषणा दरम्यान केली.

Fadanvis criticised sharad pawar during speech at BKC