3 May 2024 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

भारत-चीन विवाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

India, China, PM Narendra Modi, Galvan Valley in eastern Ladakh

नवी दिल्ली, १७ जून: पूर्व लडाखमध्ये गलवाण खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. येत्या १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.

विशेष म्हणजे सोमवारी रात्री गॅलवान खो-यात भारत आणि चीनच्या सैन्यात हिंसक चकमक झाली. या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. याखेरीज भारताच्या चार जवानांची परिस्थिती गंभीर आहे. लष्कराने याची खातरजमा केलेली आहे. त्याचवेळी या हिंसक चकमकीत चिनी सैन्याचंही मोठं नुकसान झालं आहे. भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या २० जवानांची नावे आज जाहीर करण्यात येणार आहे. चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले आहे.

सदर घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली होती. भारतीय सैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्या मुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi has convened an all-party meeting to discuss the conflict in the Galvan Valley in eastern Ladakh and the overall situation on the border with China. The all-party meeting will be held on June 19 at 5 pm.

News English Title: Prime Minister Narendra Modi has convened an all-party meeting to discuss the conflict in the Galvan Valley in eastern Ladakh News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x