16 May 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार
x

जगभर कोरोनावरील लस संदर्भात संशोधन, रशिया सर्वात पुढे - सविस्तर वृत्त

Russian Ministry of Health, Moscow based Gamaleya Research Institute, Covid 19 vaccines

मॉस्को, १८ जून : देशात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना, अद्याप लस किंवा औषध मिळाले नाही आहे. सर्वच देश कोरोनावर लस किंवा औषध शोधण्यासाठी ट्रायल करत आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने मात्र कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरलं जाणारं मलेरियाचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायलवर बंदी घातली आहे. ट्रायलचे कार्यकारी समुह आणि मुख्य अभ्यासक यांनी सॉलिडॅरिटी ट्रायल, ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल आणि अन्य पुरावे लक्षात घेऊन चाचणी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सायन्स जनर्ल ‘द लान्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानंतर HCQ चाचणीवर बंदी घालण्यात आली होती पण नंतर ही बंदी मागे घेण्यात आली.

दुसरीकडे चीनच्या नॅशनल बायोटेक ग्रुप म्हणजे सिनोफार्मने केलेल्या लस चाचणीतून अँटीबॉडीज तयार झाल्याचे म्हटले आहे. कोरोना व्हायरस विरोधात या अँटीबॉडीज तयार होणे खूप महत्वाचे आहे. जर्मनीची बायोटेक फर्म क्यूअरवॅकने करोना व्हायरसवर लस बनवली असून त्यांनी मानवी चाचण्या सुरु केल्या आहेत. १६७ तंदुरुस्त स्वयंसेवकांपैकी १४४ जणांना लसीचे इंजेक्शन देण्यात येईल. क्यूअरवॅक ही लस निर्मिती करणारी दुसरी जर्मन कंपनी आहे.

फायझर ही औषध क्षेत्रातील आघाडीची कंपनी BNTECH या जर्मन कंपनीच्या मदतीने करोनावरील लसीची निर्मिती करत आहे. टाइम्स ऑफ इस्रायलनुसार फायझरला ऑक्टोंबर २०२० अखेरीस करोनाविरोधात लस तयार झालेली असेल असा विश्वास आहे.

रशियन आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिथे सुद्धा करोना व्हायरसवर बनवण्यात आलेल्या लसीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. मॉस्को स्थित गामालेया संशोधन संस्थेने लिक्विड आणि पावडर अशा दोन प्रकारांमध्ये लस विकसित केली आहे. प्रत्येकी ३८ सदस्यांच्या दोन ग्रुपवर चाचणी घेण्यात आली आहे.

अमेरिकेची मॉर्डना, ब्रिटनची ऑक्सफर्ड आणि चीनची सिनाव्हॅक बायोटेक यांनी विकसित केलेल्या लसीच्या पुढच्या महिन्यापासून अंतिम चाचण्यास सुरु होतील. सर्व काही सुरळीत झाले तर नोव्हेंबरपर्य़ँत करोना विरोधात बाजारात लस उपलब्ध होईल. ब्रिटन आणि अमेरिकेने ही लस विकसित करण्यासाठी कोटयावधी डॉलर्स खर्च केले आहेत.

जगातील बहुतांश देशांना त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरसवर अखेर प्रभावी ठरणारे एक औषध शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. या औषधाचा वापर करुन करोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे. डेक्सामेथासोन असे या औषधाचे नाव आहे. हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे.

डेक्सामेथासोनचा डोस कमी प्रमाणात देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात असा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. कोरोनावरील उपचारांसाठी यूके सरकारने बुधवारीच डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली.

 

News English Summary: According to the Russian Ministry of Health, trials of the corona virus have begun. The Moscow-based Gamaleya Research Institute has developed vaccines in two types, liquid and powder. Two groups of 38 members each have been tested.

News English Title: According to the Russian Ministry of Health Moscow based Gamaleya Research Institute has developed covid 19 vaccines in two types liquid and powder News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x