5 May 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

घरात घुसून मारेन सांगत सत्तेत, अन जवान शहिद होताच 'घरात कोणी घुसलेच नाही'

Kanhaiya Kumar, India China

नवी दिल्ली, २० जून : भारत-चीन संदर्भातील विषयही सध्या देशात चर्चेचा विषय ठरला आहे. गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षानंतर भारतात राजकीय वातावरणही तापू लागलं. अनेक विरोधकांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यातच, भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारला अनेक सवाल उपस्थित केले.

या गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसले होते. मात्र मोदींंनी हा दावा फेटाळून लावला. चीनचे सैन्य भारतीय भूभागावर आले नव्हते, असा दावा मोदींनी केलाय. मात्र, यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दोन सवाल केले होते. “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, असं म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असा जाब राहुल यांनी सरकारला विचारला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अनेक सभांमध्ये शत्रू राष्ट्रांना उद्देशून ‘घर मे घुसकर मारुंगा’ अशी वक्तव्य केली होती. नेमका त्याचाच संदर्भ घेत कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली आहे. याबाबत ट्विट करताना कन्हैया कुमारने म्हटले आहे की, “मी घरात घुसून मारीन” असे सांगून सत्तेत आलेले आमचे २० जवान झाल्यानंतर म्हणतात की “घरात कोणतीही घुसखोरी केलेली नाही”…हे फेकूच नाही तर डरपोक सुद्धा आहेत..

News English Summary: After the martyrdom of our 20 soldiers who came to power by saying that I will enter the house and say No one enters the house says Kanhaiya Kumar News latest Updates.

News English Title: After the martyrdom of our 20 soldiers who came to power by saying that I will enter the house and say No one enters the house says Kanhaiya Kumar News latest Updates.

हॅशटॅग्स

#Kanhiya Kumar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x