4 May 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अनोळखी ई-मेल टाळा, उद्या भारतासह अनेक देशात मोठ्या सायबर अटॅकची शक्यता

hacker, cyber attack, Lazarus Group

नवी दिल्ली, २० जून : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील आता चीनवर अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाचे सरकार आणि देशातील काही खाजगी संस्था एका प्रभावी देशाच्या सायबर अटॅकच्या रडारवर होता, असं स्कॉट मॉरिसन यांनी सांगतिले आहे. ऑस्ट्रेलियन सायबर तज्ञांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर चीनच्या या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला देखील स्कॉट मॉरिसन यांनी दिला आहे. याआधी देखील सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढत असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांनीही दिली होती.

भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर अमेरिकेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी ट्वीट करून, भारताप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. माइक पोम्पिओ म्हणाले की, चीनसोबत झालेल्या संघर्षात भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला. भारतीयांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करत आहोत. या सैनिकांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि त्यांच्या समाज यांची या दु:खद प्रसंगी आम्हाला आठवण येईल, असं माइक पोम्पिओ यांनी सांगितले. तर चीनबरोबरची समस्या सोडवण्यासाठी रशियानं भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे.

दुसरीकडे २१ जून रोजीच देशात मोठा सायबर अटॅक होण्याची शक्यता असल्याचं वृत्त ZDNet च्या हवाल्याने नवभारत टाईम्सने दिलं आहे. कोरोनाच्या काळात सायबर हल्ले होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं आहे. ऑनलाईन खरेदी-विक्री किंवा एटीएम-क्रेडिट कार्डच्या सीव्हीव्ही क्रमांकांची चोरी करून त्यातून ऑनलाईन गंडा घातल्याच्या घटना देखील गेल्या काही काळात वाढल्या आहेत. त्यातच आता २१ जून रोजी हा सायबर हल्ला होण्याची भिती वर्तवली जात असून यामध्ये प्रामुख्याने जगातले ६ देश टार्गेटवर आहेत. त्यात भारताचा देखील समावेश आहे.

लझारस ग्रुप नावाचा एक हॅकर्सचा गट हा सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असून त्यातून मोठा पैसा कमावण्याची त्यांची योजना असल्याचं देखील या वृत्तात म्हटलं आहे. भारतासोबतच सिंगापूर, द. कोरिया, जपान, अमेरिका आणि ब्रिटन या हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. या देशांमधल्या अनेक कंपन्या छोटे-मोठे उद्योग आणि वैयक्तिक इमेल या गटाकडे आहेत. या इमेलवर अनोळखी नावावरून मेल पाठवून त्यातून तुम्हाला दुसऱ्या एका वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगितलं जाईल. आणि त्यातून तुमची वैयक्तिक आणि बँक अकाऊंटसंबंधीची माहिती मिळवली जाईल, असं सांगितलं जात आहे. एका माहितीनुसार या गटाकडे ५० लाखांहून जास्त अशा इमेल अकाऊंट्सची माहिती आहे.

 

News English Summary: A group of hackers called Lazarus Group is preparing to launch a cyber attack and is planning to make big money from it, the report said. Along with India, Singapore, the. Korea, Japan, the United States and Britain are the targets of hackers. Many companies in these countries belong to this group of small and large businesses and personal emails.

News English Title: A group of hackers called Lazarus Group is preparing to launch a cyber attack and is planning News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Hacker(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x