9 May 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

मोदी सरकारने कोरोना साथ आणि पेट्रोल-डिझेलचे दर 'अनलॉक' केले आहेत - राहुल गांधी

Petrol Diesel, Rahul Gandhi

नवी दिल्ली, २५ जून : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पुन्हा डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. सलग १८ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली असून यामुळे ग्राहकांवर बोझा पडत आहे. दरम्यान, दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम होता. तर डिझेलमध्ये ४८ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत वाढल्या आहेत. आज दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे.

तेल कंपन्यांनी गेल्या १८ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत सुमारे ८.५० रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर, गेल्या १८ दिवसांत डिझेल १०.२५ रुपयांनी महाग झाले आहे. मात्र, महिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. दरम्यान, पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पेट्रोल डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतीवरून मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. त्याबाबत ट्विट करून त्यांनी म्हटलं आहे की, “मोदी सरकारने कोरोना साथीचे आणि पेट्रोल-डिझेलचे दर ‘अनलॉक’ केले आहेत.”

 

News English Summary: Rahul Gandhi has sharply criticized the Modi government over the ever-increasing price of petrol and diesel. He tweeted that the Modi government has unlocked the Corona Saathi and petrol-diesel rates.

News English Title: The Modi government has unlocked the Corona epidemic and petrol diesel prices News Latest Updates.

 

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x